Today’s Horoscope 22 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 22 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार

तारीख – 22.01.2024.

शुभाशुभ विचार – शुभ दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी ७.३० ते ९.००.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – मृग.

चंद्र राशी – वृषभ 16.23 पर्यंत नंतर मिथुन.
—————————–
मेष – ( शुभ रंग – राखाडी)

बरेच दिवसापासून रखडलेली घरगुती कामे आज पूर्ण कराल स्थावराच्या खरेदी विक्रीत नफा होईल. आज मुले आज्ञेत राहतील आणि पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील.

वृषभ ( शुभ रंग- पांढरा)

आज काहीजण सहकुटुंब प्रवासाला निघतील. प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. आज वाणीत गोडवा असेल तर विरोधकांशीही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्याल.

मिथुन – ( शुभ रंग- तांबडा)

आर्थिक आवक तुमच्या मनाजोगती असेल. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणित मृदूचा ठेवली तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात मात्र त्रास होईल.

कर्क – ( शुभ रंग – मरून)

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या वाटाघाटी यशस्वी होतील. आज विरोधक तुमच्यापुढे नमते घेतील.

सिंह -( शुभ रंग – क्रीम)

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून घ्याल. काही जणांना अनपेक्षित पणे दूरचे प्रवास घडणार आहेत.

कन्या – ( शुभ रंग- मरून)

आज तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.

तूळ – ( शुभ रंग- पिस्ता)

उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यस्त दिवस.

वृश्चिक- ( शुभरंग – डाळिंबी)
आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.

धनु – (शुभ रंग- पिस्ता)

नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकला. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. खोटी स्तुती करणाऱ्यांना दुरच ठेवा. झटपट लाभाचा मोह टाळा. स्वतःवर संयम ठेवा.

मकर- (शुभ रंग- आकाशी)

कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज तुम्हाला पत्नीची खंबीर साथ राहील.

कुंभ – (शुभ रंग- गुलाबी)

काही किरकोळ वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येय प्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मीन – ( शुभ रंग- केशरी)

कला क्षेत्रातील मंडळींना उत्तम संधी चालून येतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.