Talegaon Dabhade : राम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – अयोध्या येथे राम मंदिरात श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा (Talegaon Dabhade) सोमवारी (दि. 22) केली जाणार आहे. त्यानिमित्त निखिल उल्हासराव भगत मित्रपरिवार यांच्या सौजन्याने यशवंत नगर तपोधाम नागरिक यांच्या वतीने सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतनगर येथील गोळवलकर गुरुजी क्रीडांगण (गोल मैदान) यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे सकाळी साडेसात पासून रात्री पर्यंत कार्यक्रम पार पडणार आहेत.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र,अयोध्या श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त श्री रामजन्मभूमी अयोध्या नगरी येथे 500 वर्षांच्या अथक संघर्षानंतर व अनेक ज्ञात अज्ञात रामभक्त,कारसेवकांच्या बलिदानातून आपले आराध्य दैवत प्रभू श्रीराम मंदिर साकार होत आहे व या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आज सोमवार (दि. 22) जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त आपल्या येथे रामयाग व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात सहकुटूंब सहभागी (Talegaon Dabhade) व्हावे ही विनंती.
– कार्यक्रमाची रूपरेषा –
स. 7.30वा   पुण्यहवाचन

8.15 वा   अभिषेक
9.30 वा      हवन
11.00 वा  पुर्णाहुती
11.30 वा अयोध्या राममंदिर लोकार्पण सोहळा लाईव्ह प्रक्षेपण व महाआरती
12.30 वा   महाप्रसाद
5.00 वा  किर्तन, किर्तनभूषण क्रांतिगीता महाबळ
6:30 वा  भजन- ओजस्विनी भाव भक्तीगीत मंडळ
7:30 वा दीपोत्सव व महाआरती

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.