Today’s Horoscope 24 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 February 2023
वार – शुक्रवार.
24.02.2023
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – अश्विनी.
चंद्र राशी – मेष.
—————————————-
मेष (शुभ रंग – मोतिया)
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे विना व्यक्ती पार पडतील. उपवारांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक तुमच्यापुढे नमते घेतील. वाणीत गोडवा असू द्या.

वृषभ (शुभ रंग – हिरवा)
कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होणारच आहे. पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना आज अनपेक्षित पणे दूरवरचे प्रवास घडणार आहेत.

मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

कर्क (शुभ रंग – मरून)
उच्च अधिकारी वर्गास आज अधिकार वापरावेच लागणार आहेत. नोकरीत प्रमोशनच्या मार्गातले अडथळे दूर होतील. आज तुम्ही कर्तव्यासंच प्राधान्य देणे गरजेचे आहे. अतिव्यस्त दिवस.

सिंह (शुभ रंग – निळा)
आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

कन्या ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात कोणतीही (Today’s Horoscope 24 February 2023) धाडसाची कामे आज टाळावीत. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून आज दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळलेला बरा. स्वतःवर संयम असू द्या.

तूळ (शुभ रंग – भगवा)
कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराची खंबीर साथ राहील.

वृश्चिक (शुभ रंग – आकाशी)
किरकोळ वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी उभ्या राहतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना मात्र दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.

धनु (शुभ रंग – जांभळा)
कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पुरेसा पैसाही खर्च करू शकाल.

मकर (शुभ रंग – केशरी)
आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात झालेल्या नव्या ओळखी भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

कुंभ (शुभ रंग – लाल)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

मीन (शुभ रंग – पांढरा )
तुमची आर्थिक आवक मना जोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणिज मृदुता ठेवली तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात मात्र त्रास होईल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.