Today’s Horoscope 26 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 26 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 26.11.2023.

शुभाशुभ विचार – 14  प. चांगला दिवस. 

आज विशेष – वैकुंठ चतुर्दशी.

राहू काळ – 4.30  ते 06.00

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – भरणी 14.05 पर्यंत नंतर कृतिका.

चंद्र राशी – मेष 19.56 पर्यंत नंतर वृषभ.

—————————–

मेष ( शुभ रंग – पिस्ता)

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका.

वृषभ ( शुभ रंग- मोतिया)

आज घरात वडीलधाऱ्यांची मने सांभाळावी लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.

मिथुन ( शुभ रंग- मोरपिशी)

आज काही मना जोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आज तुमचा दिवस आनंदात जाईल.

कर्क  ( शुभ रंग – राखाडी)

नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे तुम्हाला अवघड होईल.

सिंह  ( शुभ रंग – क्रीम)

नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली कराव्यात. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरेल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

कन्या  ( शुभ रंग- डाळिंबी)

कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागेल.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी आज चांगले सूर जुळतील.

वृश्चिक ( शुभ रंग – जांभळा)

आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होऊ शकतील. प्रवासात मात्र आज सावध राहा.

धनु  (शुभ रंग- राखाडी)

आज एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रात नवोदिकांना उत्तम संधी चालून येतील.

मकर  (शुभ रंग- भगवा)

आज स्टेशनरी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना यश सोपे नाही स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

कुंभ   (शुभ रंग- निळा)

ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करा. आज आईच्या शब्दाचा मान राखा. वादविवाद तर टाळाच.

मीन   ( शुभ रंग- केशरी)

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमचा मूड छान असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.