Today’s Horoscope 28 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 July 2023
वार – शुक्रवार
28.07.2023
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- अनुराधा.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————————-
मेष  ( शुभ रंग- केशरी )
कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस तितकासा चांगला नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायलाच हवा. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत, सामान्य दिवस.

वृषभ (शुभ रंग- जांभळा)
सगळी महत्वाची कामे आज तुम्ही दिवसाच्या पूर्वार्धातच करा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवून वाद टाळा.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी आज तुम्ही वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. तब्येत तुमची आज थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस प्रवेश नको.

कर्क (शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ राहील. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सोडवाल. डॉक्टरांना आज असाध्य आजारावर अचूक उपाय सापडेल.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यातच राहील. आज तुम्ही घर सजावटीस प्राधान्य द्याल.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)
नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना रागावर लगाम ठेवा.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)
आज मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा. अनावश्यक खर्च टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा.

धनु- (शुभ रंग- भगवा) – Today’s Horoscope 28 July 2023
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले मनशांतीसाठी सत्संगाकडे आपोआपच वळतील.

मकर ( शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. अधिकार योग चालून येतील. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मोठा भाऊ आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

कुंभ (शुभ रंग -गुलाबी)
आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकाराचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील.

Pune – Mumbai Express Way : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली

मीन (शुभ रंग – क्रीम )
कार्यक्षेत्रात डोक्यात ताप देणाऱ्या काही घटना घडणार आहेत नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच सांगा फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.