Pune – Mumbai Express Way : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune – Mumbai Express Way)  कामशेत बोगदाजवळ दरड कोसळली. ही घटना गुरुवारी (दि. 27) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पुणे मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Pune : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘अनंत’ दृष्टिकोन ठेवावा: डॉ. ज्ञानेश्वर मुळे

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पुणे मुंबई लेनवर कामशेत बोगद्याजवळ रात्री पावणे नऊच्या सुमारास दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच आय आर बी, देवदूत आपत्कालीन पथक, खंडाळा, वडगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या पथकांनी दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पुणे, रायगड, मुंबई जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे द्रुतगती मार्गालगत असणाऱ्या डोंगरावरील दरड रस्त्यावर पडण्याच्या घटना घडत आहेत.

 

यापूर्वी 24 जुलै रोजी पुणे मुंबई लेनवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. यावेळी पुणे मुंबई मार्गावरील तीनही लेन वाहतुकीसाठी बंद केल्या होत्या. त्यावेळी दरडीचा काही मलबा डोंगरावर अडकून पडला होता. तो काढण्यासाठी गुरुवारी (दि. 27) दुपारी बारा ते दोन या कालावधीत द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.