Today’s Horoscope 7 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, सोमवार, दि​. 7 ​​सप्टेंबर ​2020

  • शुभाशुभ – चांगला दिवस.
  • आज विशेष – भरणी श्राध्द.
  • राहूकाळ – सकाळी 07.30 ते 09.00
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • नक्षत्र –  भरणी
  • आजची चंद्र राशी – मेष.

आजचे राशीभविष्य

मेष (शुभ रंग- पांढरा) आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत.  व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. मी म्हणेन तीच पूर्व असे तुमचे आज धोरण असेल.

वृषभ (शुभ रंग – तांबडा) अत्यंत उत्साहवर्धक दिवस असून नोकरीच्या ठिकाणी आज वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. कलाकारांना विदेशात प्रसिद्धी मिळेल. काही देणी चुकवावी लागतील.

 

मिथुन (शुभ रंग-पिस्ता) जिवलग मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दुरावलेले नातलग जवळ येतील. आज आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करू शकाल. आज आनंदी दिवस आहे.

 

कर्क (शुभ रंग-हिरवा) नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे दडपण राहील काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार पाडावे लागतील. वरिष्ठांनी दिलेल्या आश्वासनांना बळी पडू नका.

 

सिंह (शुभ रंग- सोनेरी) महत्वाच्या कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. आज हाती असलेले पैसे जपून वापरा. संध्याकाळी एखादा न टाळता येणारा खर्च उद्भवणार आहे. दानधर्म करताना आधी शिल्लक तपासा.

 

कन्या (शुभ रंग-मोरपंखी) कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. अशावेळी मानसिक संतुलन ढळू देऊ नका. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचा विचारही करू नका.

 

तूळ (शुभ रंग – आकाशी) महत्वाच्या चर्चेत आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. वैवाहिक जीवनात सामंजस्य असून आज कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. मुले आज्ञाधारक पणे वागतील.

 

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) नोकरीच्या ठिकाणी आज मान मोडून काम करावे लागेल. तुमचा एखादा निर्णय चुकण्याची शक्यताधा आहे.  वरिष्ठांना काही, सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

धनु (शुभ रंग 8 भगवा) मुलांच्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. नवोदित कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल.

मकर (शुभ रंग – पिवळा) प्रॉपर्टी खरेदी-विक्रीची रखडलेली कामे गती घेतील. मानसिक शांतता लाभेल व तुमचे आरोग्यही उत्तम राहील. गुढी आल्यागेल्याचे स्वागत आनंदाने करतील.

 

कुंभ (शुभ रंग- जांभळा) नव्या ओळखी होतील तुमचा मित्रपरिवार वाढेल. आज कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र शुभ रंग गुलाबी सावध राहा. एखादा पत्ता शोधण्यासाठी भटकंती होईल.

मीन(शुभ रंग – गुलाबी) उच्चशिक्षिताना विदेश गमनाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. भक्तीमार्गात असलेल्यांना सद्गुरु कृपेचा लाभ होईल. आज तुम्हाला सत्संगाची ओढ लागेल.

 

श्री. जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.