Gandhi Jayanti : गांधी जयंती दिवशी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ ट्वीटवर ट्रेन्डिंग 

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शनिवारी (दि.02, ऑक्टोबर) जयंती साजरी झाली. या दिवशी महात्मा गांधी यांना गोळ्या झाडून ठार केलेल्या नथुराम गोडसे याचे नाव ट्वीटवर ट्रेन्डिंग असल्याचे दिसून आले. शनिवारी ट्वीटवर ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा हॅशटॅग ट्रेन्डिंग होत होता. 

महात्मा गांधीजींच्या जयंतीला राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते अनेक पक्षाच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पण सोशल मीडियावर मात्र नथुराम गोडसे जिंदाबाद हे ट्रेंडवर होते. हा हॅशटॅग वापरून 1 लाख 86 हजार लोकांनी ट्वीट केले. अनेकांनी हा हॅशटॅग वापरून ट्वीट करणा-यावर टिका केली आहे तर, अनेकांनी समर्थन केल्याचे दिसून आले.

यावर भाष्य करताना भाजप खासदार वरुण गांधी म्हणाले, ‘महात्मा गांधी आणि त्यांच्या आदर्शांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला जो सन्मान मिळाला आहे, तो विसरता येणार नाही. ‘गोडसे जिंदाबाद’ असे ट्विट करणाऱ्यांची नावे घेऊन त्यांचीही जाहीरपणे लाज काढली पाहिजे. हा मूर्खपणा आहे, त्याला मुख्य प्रवाहात स्थान दिले जाऊ नये’, असं वरुण गांधी म्हणाले.

नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.