Bhosari News :  गल्लीत खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; एकास अटक

एमपीसी न्यूज – गल्लीतील मुलींसोबत खेळत असलेल्या एका अकरा वर्षीय मुलीसोबत एका व्यक्तीने अश्लील चाळे केले. ही घटना शनिवारी दि. 2 दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

संजय टोप बहादुर सुनार वय 23, रा. कासारवाडी, पुणे. मूळ रा. नवलपाशी नेपाळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास पीडित अकरा वर्षीय मुलगी तिच्या इतर मैत्रीणींसोबत गल्लीत खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले. याबाबत फिर्यादी महिलेने आरोपीला जाब विचारला. त्यावर आरोपीने अरेरावीची उत्तरे दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी  आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.