Traffic jam : त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक रस्त्यावरील तीव्र वाहतूक कोंडीने लाखो कामगार व नागरीक त्रस्त

एमपीसी न्यूज : अरुंद गणेशनगर चौक मुळे त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक रस्त्यावर दररोज सकाळी व संध्याकाळी तीव्र वाहतूक कोंडी होते. (Traffic jam) या वाहतूक कोंडीमुळे लाखो कामगार व नागरिक त्रस्त झाले आहेत.

1997 पूर्वी तळवडे हे एक गाव होते जेथे मोठ्या प्रमाणात शेती होती. पण 1997 मध्ये ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये आल्यामुळे तळवडे गावामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली.(Traffic jam) येथे घरे व छोटे उद्योग वाढले. तसेच इंद्रायणी नदीवर पूल झाल्याने चाकण एमआयडीसी मध्ये जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला. त्यामुळे तळवडे मध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे.

निगडी प्राधिकरणातील त्रिवेणीनगर चौक हा एक महत्वपूर्ण व मोठा चौक आहे. येथून तळवडे व पुढे तळवडे आय टी पार्क व चाकणला जाता येते. त्यामुळे 4 ते 5 काम लांबीचा त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक रस्त्यावर दररोज सकाळी वे संध्याकाळी खूप वर्दळ असते.(Traffic jam) यामध्ये ट्रक्स, मोठे कंटेनर ट्रक्स, कंपनी बसेस जास्त असल्याने वाहतूक कोंडी होऊन लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

Diwali pahat : दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करणार : ज्योती कळमकर

त्रिवेणीनगर चौकातील समस्या: 

त्रिवेणीनगर चौक येथे स्पाईन रोड, टेल्को रोड वे तळवडे रोड चे ट्रॅफिक एकत्र येते. त्यामुळे येथे खूप मोठया प्रमाणात वाहतूक असते. या चौकात खड्डे पडले आहेत. तसेच खडी पसरल्याने दुचाकी वाहने घसरून पडतात. त्यामुळे किरकोळ जखमा होतात.

 

गणेशनगर चौक ‘बॉटल नेक’ असल्याने वाहतूक कोंडी

गणेशनगर चौक येथे रोड ‘s’ आकाराचा आहे. त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक हा चार पदरी रोड आहे पण गणेशनगर चौक च्या दोन्ही बाजूला 100 मीटर पर्यंत तो दोन पदरी असल्याने वाहतूक कोंडी होते.  या चौकात खडी पसरल्याने वाहने हळू चालतात. त्यामुळे येथे वाहनांच्या लांब रांगा लागतात.

 

ड्रेनेज चेंबर्स मुळे वाहतूक मंदावते

पुर्ण त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक रस्त्यावर दोन्ही बाजूला रस्त्याचे कडेला किंवा मधूमध ड्रेनेज चेंबर्स आहेत. ड्रॅनेज चेंबर्स वरील लोंखंडी सळ्या 1 ते 4 इंच खाली असल्याने खड्डा तयार झाले आहेत. हे चेंबर चुकविण्यासाठी वाहने आपली गती कमी करतात व तिरकी चालतात. त्यामुळे वाहतूक मंदावते. काही वाहनांना इतर वाहणामुळे पुढील ड्रेनेज चेंबर नाही दिसले तर ते आदळतात.

 

90 टक्के कार्स मध्ये फक्त एक माणूस असतो त्यामुळे वाहने वाढून वाहतूक कोंडी होते

छोटे व मध्यम उद्योग (MSME) यांचे मालक वे मोठ्या कपंनीचे अधिकारी येण्या – जाण्यादाठी कार वापरतात. या कार मध्ये एकाच व्यक्ती असतो त्यामुळे वाहनांची संख्या वाढते वे वाहतूक कोंडी होते.

 

रस्ता दुभाजकामध्ये खूप पंचर्स मुळे वाहतूक कोंडीत वाढ

पुर्ण त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक रस्त्यावर दुभाजकामध्ये पंचर्स 30 ते 40 फुटावर असल्याने वाहने त्यामधून ये- जा करतात. या पंचर मधून कार किंवा ट्रक जाण्याचा प्रयत्न करत असेल तर एका बाजूचा रस्ता पुर्ण बंद होतो व दुसऱ्या वाहनांना थांबावे लागून वाहनांची  लांब रांग लागते.

 

नागरिकांची प्रतिक्रिया

दुकानदार रघुनाथ सोनटक्के म्हणाले की येथे रात्री 8 वा नंतर वाहतूक कोंडी नसते त्यामुळे मी 8 वा नंतरच घरी जायला निघतो. सकाळी आणि संध्याकाळी येथून लाखो वाहने व नागरिक जातात पण कुणीही येथे दुकानातून  खरेदीसाठी थांबत नाही कारण त्यांना वाहतूक कोडींतून लवकरात लवकर बाहेर पडून ऑफिस किंवा घरी जायची घाई असते.

त्रस्त वाहन चालक

  • स्थानिक नागरिक संभाजी पाटील म्हणाले की गणेशनगर चौक रुंदीकरण करून मोठा केला पाहिजे.  येथे रस्ता दोन लेन चा असून तो वाढवून चार लेनचा केला पाहिजे.
  •  स्थानिक नागरिक शुभम पाटील म्हणाले की बसेस, ट्रक्स व आवाजड वाहने यांना सकाळी आणि संध्याकाळी ह्या रस्त्यावर बंदी करावी जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही.
  • विलास भालेकर म्हणाले की कंपनी च्या बसेस या रस्त्यावर कामगारांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी थांबतात त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते.
  •  प्रजापती परमार म्हणाले की दररोज मला त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक जाण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे  एक तास लागतो.

 

यावरील संभावित उपाय

  1. गणेशनगर चौक येथे रस्ता रुंदीकरण करणे
  2. कार पूलिंग करणे ज्यामुळे रस्त्यावर कमी कार धावतील. एका कार मध्ये जास्त प्रवासी प्रवास करतील. त्यामुळे रस्त्यावर कमी कार्स असतील.
  3. डांबरीकरण चांगले करून खड्डयांची दुरुस्ती करावी ज्यामुळे खडी बाहेर येणार नाही.
  4. दुभाजकातील पंचर्स कमी करावेत ज्यामुळे कमी वाहने दुभाजकातून आत – बाहेर कमी येतील व वाहतूक कोंडी होणार नाही.
  5. ड्रेनेज चेम्बर्स रस्त्याच्या लेवल पेक्षा खाली आहेत. रस्त्याची व ड्रेनेज चेम्बर्सची लेवल एक समान करावी ज्यामुळे वाहने त्यांना चुकवण्यासाठी धिमी होणार नाहीत किंवा आदळणार नाहीत.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे म्हणणे:

विजय काळे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, फ प्रभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणाले की गणेशनगर चौक रुंदीकर्णासाठी जागा ताब्यात लागेल. भू संपादन विभाग ही जागा ताब्यात घेईल. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. दुभाजकातील पंचर्स बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध आहे.

 

भू संपादन विभागाचे म्हणणे:

भूमी संपादन अधिकारी, विशेष गट क्रमांक 1 यांच्या कार्यालतून कळाले की गणेशनगर चौक रुंदीकरणासाठी 4,400 चौ. मी. क्षेत्राचे भू संपादन केले जाणार आहे. याबाबतचा महानगरपालिकेने अभिप्राय दिलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.