Hinjawadi crime : स्कॉरर्पिओ च्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला स्कॉर्पिओ (Hinjawadi crime) समोरून धडक देऊन जखमी केले आहे. हा प्रकार नेरे गाव येथे मंगळवारी घडला.

नियाज निजाम शेख (वय 29 रा. कासारसाई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून स्कॉर्पीओ गाडी एमएच 12डीएस 6219 या गाडी चालकावर गुन्हाा दाखल करण्यात आला आहे.

Traffic jam : त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक रस्त्यावरील तीव्र वाहतूक कोंडीने लाखो कामगार व नागरीक त्रस्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात असताना स्कावर्पीओ चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी बेदरकारपणे चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यावेळी फिर्यादी यांच्या डोक्याला व हाताल जबर मार लागल्याने ते जखमी झाले तसेच फिर्यादीच्या गाडीचे नुकसान झाले.(Hinjawadi crime) स्कॉर्पिओ चालक अपघातानंतर तेथे न थांबता पळून गेला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.