Chinchwad : चापेकर चौकातील पुलावर शॉर्ट सर्किटमुळे मालवाहतूक करणा-या ट्रकला आग (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – चिंचवड, चापेकर चौकातील पुलावरुन जाणा-या एका मालवाहतूक ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. ट्रकचा टायर फुटल्याने धुराचे लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. ही घटना दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 12 एचडी 0220 या क्रमांकाचा मालवाहतूक ट्रक शुक्रवारी खेड-शिवापूरवरुन माल घेऊन आला होता. पिंपरीतील एका कंपनीत माल खाली केल्यानंतर चालक शिवाजी सावंत हे हा ट्रक घेऊन आज शनिवारी दुपारी खेड-शिवापूरला चालले होते. दुपारी सव्वादोनच्या सुमारास चापेकर चौकातील पुलावरुन थेरगावकडे जात असताना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ट्रकला आग लागली. यामध्ये ट्रक जळून खाक झाला आहे.

टायर फुटल्याने मोठा आवाज होऊन धुराचे लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती.   बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पिंपरी, संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे दोन बंब आणि प्राधिकरणातील एक असे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 15 मिनिटाच्या आतमध्ये आग आटोक्यात आणली, अशी माहिती फायरमन अशोक कानडे यांनी दिली. दरम्यान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=IqlWDxoHZnc&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.