Chinchwad Crime News : धोबी घाट येथे दरोडा टाकून इसमाला लुटले, कारचेही केले नुकसान

एमपीसी न्यूज – सात जणांच्या टोळक्याने दरोडा टाकत इसमाला लुटले तसेच, घराबाहेर पार्क केलेल्या कारचेही नुकसान केले. धोबी घाट, दत्तनगर, चिंचवड, पुणे येथे गुरूवारी (दि.31) मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

रामदास पोपट भिवरकर (वय 37, रा. धोबी घाट, दत्तनगर, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून सुरज गायकवाड (वय 22), सुप्रीम काळे, विनायक क्षिरसागर, सज्जाद शेख, नाईंटी (पूर्ण नाव माहिती नाही), निलेश हेळवार (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड), अनिल उर्फ अन्या उर्फ संतोष गोरख जाधव (वय 30, रा. कुदळवाडी, चिखली) या सात जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यापैकी अनिल उर्फ अन्या उर्फ संतोष गोरख जाधव आणि सुरज गायकवाड हे दोघे अटक आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टोळक्याने फिर्यादी यांच्या घरी येऊन दार वाजवले. फिर्यादी व त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला त्यानंतर एका आरोपीने फिर्यादीला पकडले. तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे दे काढून दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, तुझा कार्यक्रम संपला अशी धमकी दिली.

एका आरोपीने फिर्यादी यांना धाक दाखवून त्यांच्या खिशातील 600 रूपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून घरासमोर पार्क केलेली त्यांची कारवर (MH 12 MR 4520) दगड, सिमेंटचे गट्टू, विटा मारून नुकसान केले. दोघांना अटक केली असून, पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.