Wakad Crime News : नेट बँकिंगचा आयडी, पासवर्ड चोरून 1 लाख 80 हजाराची फसवणूक, 36 वेळा केले ट्रान्झेकशन

एमपीसी न्यूज – नेट बँकिंगचा आयडी, पासवर्ड चोरून 1 लाख 80 हजाराची फसवणूक केली. चोरट्याने तब्बल 36 वेळा ट्रान्झेक्शन करून ही रक्कम चोरली. 21 ऑक्टोबर ते नोव्बेंबर 2021 या कालावधीत रहाटणी येथे ही घटना घडली.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्योविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या नेट बँकिंगचा आयडी, पासवर्ड चोरून 1 लाख 79 हजार 880 रूपयांची फसवणूक केली. आरोपीने तब्बल 36 वेळा ट्रान्झेकशन करून ही रक्कम काढून घेत फसवणूक केली. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.