Hinjawadi Crime News : कर्जदार महिलेचे अश्लील फोटो बनवून व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशन मधून एका महिलेने कर्ज घेतले. ते कर्ज महिलेने व्याजासहित परत केले. त्यानंतर दोन्ही ऍप्लिकेशन धारक तीन मोबाईल क्रमांकावरून अज्ञातांनी कर्जदार महिलेचे अश्लील फोटो बनवले. ते फोटो महिलेच्या नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार 22 जानेवारी ते 23 फेब्रुवारी 2022 या कालावधीत बावधन येथे घडला.

पीडित महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9893603219, 7568025277, 7305476983 या क्रमांकावरील व्यक्ती आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना त्यांनी स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशन मधून कर्ज घेतले होते. त्यानंतर ते कर्ज त्यांनी व्याजासहित परत केले. त्यांनतर स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशनचे मोबाईल नंबर 9893603219, 7568025277, 7305476983 यावरील इसम तसेच महिला यांनी फिर्यादी यांच्या चेह-याचा वापर करून त्यांचा अश्लील फोटो तयार केला.

तो त्यांच्या मोबाईल नंबरवर पाठवून त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवला. तसेच फिर्यादी यांचे पॅनकार्ड व आधारकार्डचा वापर करून आरोपींनी फिर्यादी यांचा अश्लील व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ देखील फिर्यादीच्या नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापू देशमुख तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.