Pimpri Crime News : फोनवर बोलत चाललेल्या महिलेचा मोबाईल हिसकावला, दुचाकीवरून आले चोरटे

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी फोनवर बोलत चाललेल्या महिलेचा मोबाईल हिसकावला. फकीरभाई पानसरे उर्दु शाळेच्या समोरील बस स्टॉपच्या पुढे, पिंपरी येथे शुक्रवारी (दि.01) ही घटना घडली.

अल्फीया नजीर शेख (वय 20, रा. इंदिरानगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला फकीरभाई पानसरे उर्दु शाळेच्या समोरील बस स्टॉपच्या पुढून मोबाईल फोन वरती बोलत जात होत्या. त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातून 5,000 रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.