Chakan Crime News : चाकण आणि भोसरीत दोन घरफोड्या; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – चाकण येथे एका घरात चोरी करून चोरट्यांनी एक लाख 35 हजारांचा तर भोसरी येथील एका घरात चोरी करून चोरट्यांनी 42 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 18) चाकण आणि भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अलतमश समशुद्दीन काझी (वय 24, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शुक्रवारी (दि. 17) सकाळी आठ ते रात्री नऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे लॅच व कडी, कुलूप तोडले. घरातील लाकडी कपाटाचे लॅच तोडून कपाटातून एक लाख 20 हजारांचे चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि 15 हजारांची सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

दीपक रवींद्र लिंगायत (वय 28, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शुक्रवारी (दि. 17) सकाळी आठ ते शनिवारी (दि. 18) सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून 17 हजार रुपये किमतीचे दागिने आणि 25 हजारांची दुचाकी असा एकूण 42 हजारांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.