Chinchwad Crime News : वाल्हेकरवाडी, वाकड मधून दोन मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी येथे घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून एक मोबाईल फोन चोरून नेला. तर वाकड येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या खिशातून एक मोबाईल फोन चोरून नेला. याप्रकरणी रविवारी (दि. 29) चिंचवड आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद केली आहे.

बळीराम पांडुरंग माने (वय 26, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून 15 हजारांचा मोबाईल फोन चोरट्याने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 28) मध्यरात्री दीड ते सकाळी दहा वाजताच्या कालावधीत घडली.

लक्ष्मण सबाजी टाव्हरे (वय 58, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या घराजवळ भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. भाजी घेत असताना ते खाली वाकले असता एका चोरट्याने फिर्यादी यांच्या वरच्या खिशातून नकळत 13 हजारांचा मोबाईल फोन चोरून नेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.