Pimpri News: ‘स्मार्ट सिटी’च्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किरणराज यादव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किरणराज यादव यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी दिले आहेत. यादव आज (सोमवारी) पदभार देखील स्वीकारला. महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्याकडे पूर्वी पदभार होता, त्यांच्याजागी यादव यांची नियुक्ती झाली.

पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत तिस-या टप्प्यात समावेश झाला. 30 डिसेंबर 2016 रोजी शहराची स्मार्ट सिटीत निवड झाली. पाच वर्षात स्मार्ट सिटीतील एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही. ‘स्मार्ट सिटी’ कंपन्यांचा गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 एप्रिलपासून कोणतीही निविदा प्रक्रिया राबवू नये, असे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने सर्व ‘स्मार्ट सिटी’ कंपन्याना दिले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी जून महिन्यांत ‘स्मार्ट सिटी’ कंपन्यांचे कामकाज थांबणार असून, हा सर्व कारभार संबंधित महापालिकांच्या ताब्यात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांच्याजागी किरणराज यादव यांची नियुक्ती झाली.

किरणराज यादव यांची शैक्षणिक अर्हता B.Sc.Electronics, LL.B(Gen) आहे. सध्या मुख्याधिकारी गट अ (निवड श्रेणी) या पदावर नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. सन 1991 पासून राज्य व केंद्र शासनाच्या सेवेत आहे.आतापर्यंत विक्रीकर निरीक्षक, केंद्रीय सीमा शुल्क व अबकारी निरीक्षक (सहा वर्ष) व मुख्याधिकारी म्हणून जिल्हा जळगाव मध्ये फैजपूर, सावदा,यावल , कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर व सातारा येथे जिल्हा प्रशासन अधिकारी, नंतर वाशिम नगरपरिषद( जिल्हा वाशिम), सिंधुदुर्ग , तसेच बारामती नगरपरिषद, जिल्हा,पुणे येथे मुख्याधिकारी पदावर पाच वर्षे आणि नवी मुंबई महानगरपालिका येथे तीन वर्षे उपायुक्त म्हणून काम केले आहे. आता प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी’च्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर यादव यांची बदली झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.