Crime News : कार थांबवून चालकाची हिसकावली सोनसाखळी

एमपीसी न्यूज – आत्तापर्यंत चलत-चलत किंवा थांबले असताना चोरांनी सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना तुम्ही एकल्या असतील मात्र वाकड येथे चक्क कारला हात दाखवून थांबवले व त्यानंतर कार चालकाची सोनसाखळी हिसकावली.ही घटना भूमकर चौकात मंगळवारी (दि.13) रात्री साडेबारा वाजता घडली.

याप्रकरणी दिपक नथ्थु पाटील (वय 26 रा.वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Charohali News : पीएमपीएमएलच्या चार्जिंगसाठी उभारणार ईव्ही चार्जिंग; 7 कोटींचा खर्च

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे त्यांच्या मित्राला भूमकर चौकातील सीसीडी येथे सोडून जात होते. यावेळी ते सबवेजवळ गेले असता दुचाकीवरील आरोपींनी त्यांना हाताने थांबण्याचा इशारा केला. फिर्यादी यांनी गाडी थांबवून गाडीची काच खाली केली असता आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील 16.19 ग्रॅम वजनाची 48 हजार 570 रुपयांची चेन हिसकावली.यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.