Talegaon-Dabhade crime : सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी (Talegaon-Dabhade crime) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

सचिन संजीवन शिंदे (वय 29, रा. विश्रांतवाडी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 33 आणि 32 वर्षीय महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Chikhali crime : सासूला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या जावयावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर दोन महिला अश्लील हातवारे करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग करीत होत्या.(Talegaon-Dabhade crime) याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.