Chikhali crime : सासूला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या जावयावर गुन्हा

एमपीसी न्यूज – सासरी जाऊन सासूसोबत गैरवर्तन करून तिला मारहाण केल्याप्रकरणी जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Chikhali crime) ही घटना रविवारी (दि. 13) रात्री ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घडला.

Hinjawadi fraud : मुलीची पॉलीसी काढून देतो म्हणत एजंटकडून अडीच लाखांची फसवणूक

याप्रकरणी 47 वर्षीय सासूने 30 वर्षीय जावयाच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची नात घरी असताना आरोपी जावई घरी आला. त्याने फिर्यादीस शिवीगाळ करून त्यांचे डोके भिंतीवर जोरात आपटले. (Chikhali crime) त्यानंतर फिर्यादी सोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार सुरु असताना फिर्यादींचा मुलगा घरी आला असता आरोपीने मुलाला देखील मारहाण केली आणि पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.