Unlock 1 Restrictions:’या’ छोट्याला मास्क न घालणे ‘नवाबां’ना पडले महाग

Unlock 1 Restrictions: saif ali khan kareena kapoor did not wear a mask to taimur एरवी कोणतीही गोष्ट चोरी चुपके करायची असेल तर मास्क, बुरख्याचा वापर केला जातो. पण आता जेव्हा मास्क बंधनकारक आहे तेव्हा मात्र हे सेलिब्रेटी मास्क वापरत नाहीत.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले होते. आजपासूनच अनलॉक १ सुरु झाला. खरंतर सर्वांनाच मनसोक्त कोणतेही बंधन न ठेवता बाहेर भटकायचे आहे. पण तरीदेखील काही बंधने पाळणे समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहे. पण स्वत:ला या जगातलेच न समजणा-या सेलिब्रेटींनी आपण वेगळे आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिले. छोटे नवाब सैफ अली खान व त्यांच्या बेगम करीना कपूर -खानने रविवारी मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला.

त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा तैमूरदेखील होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तैमूरला मास्क घातला नव्हता. मात्र फार थोडाच वेळ त्यांना समुद्रकिनाऱ्याची सफर करता आली.

कारण लहान मुलांना बाहेर फिरण्यास परवानगी नाही असं गस्तीवरील पोलिसांनी सांगताच सैफ-करीना तैमूरला घेऊन घरी परतले. तैमूरसोबत मरीन ड्राइव्हवर फिरतानाचे सैफ-करीनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी करीना आणि सैफला ट्रोल केले.

मास्क न घालता तैमूरला बाहेर नेण्यावरुन प्रचंड टीका झाली. अनलॉक १ अंतर्गत लोकांना मॉर्निंग वॉक करण्यास, घराबाहेर फिरण्यास परवानगी आहे. मात्र मास्क वापरणे, १० वर्षांखालील लहान मुलांना बाहेर न आणणे असे काही नियम लोकांना पाळावे लागणार आहेत.

सेलिब्रेटींना स्वत:ला मिरवणे फार आवश्यक असते. मात्र मास्क घातल्यामुळे त्यांची आयडेन्टिटी लपली जाते. एरवी कोणतीही गोष्ट चोरी चुपके करायची असेल तर मास्क, बुरख्याचा वापर केला जातो. पण आता जेव्हा मास्क बंधनकारक आहे तेव्हा मात्र हे सेलिब्रेटी मास्क वापरत नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.