Ahmednagar : लक्झरी बसची ट्रकला धडक; 5 ठार; 11 जखमी

औरंगाबादवरून पुण्याच्या दिशेने येत असताना झाला भीषण अपघात

एमपीसी न्यूज – अहमदनगर-पुणे महामार्गावर लक्झरी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात बस चालकासह 5 जण जागीच ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले. हा अपघात पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे साडेपाच वाजता घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, भवानी ट्रॅव्हल्सची लक्झरी पॅसेंजर बस औरंगाबादहून पुण्याला येत होती. पहाटे पाचच्या सुमारास बसने पुण्याच्या दिशेने जाणाच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालकासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, माहिती मिळताच सुपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना तातडीने शिरूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अद्याप मयतांची ओळख पटली नसून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. भीषण अपघात झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.