Mumbai News : स्त्री आधार केंद्राच्या वतीने चेंबूर येथील कष्टकरी आणि गरजू महिलांचे लसीकरण 

एमपीसी न्यूज : स्त्री आधार केंद्र पुणे ह्यांच्या पुढाकाराने आणि कोरो इंडिया मुंबई ह्यांच्या सहयोगाने दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चेंबूर मधील कष्टकरी आणि गरजू महिलांसाठी कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण रामकृष्ण बजाज चॅरिटेबल ट्रस्ट व आय. एम. सी सेंच्युरी ट्रस्ट  यांच्या संयुक्त विद्यमान् व स्त्री आधार केंद्र पुणे ह्यांच्या पुढाकाराने आणि कोरो इंडिया मुंबई ह्यांच्या सहयोगाने, अपोलो हॉस्पिटल देवनार येथे घेण्यात येईल.

एकूणच कोरोनामुळे सगळ्यात जास्त सोसाव लागल ते हातावरील पोट असलेल्या समूहाला, त्यातही महिला जास्त भरडल्या गेल्या आणि लसीकरणाचेहि तेच होऊ नये म्हणून स्त्री आधार केंद्राने हा पुढाकार घेतला आहे. एकाच दिवशी 250 महिलांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे .

ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य, ह्यांच्या हस्ते स्त्री आधार केंद्र, विशवस्त जेहलम जोशी, अपोलो हॉस्पिटल चे सेंटर मेनेजर संजोय सामंता तसेच कोरो राईट टू पी टीम व स्त्री आधार केंद्राच्या कार्यकत्यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.