Vadgaon Crime News : निगडे येथे आढळला बेपत्ता विवाहित तरुणाचा मृतदेह

एमपीसीन्यूज : घरातून काहीही ना सांगता निघून गेलेल्या 30 वर्षीय विवाहित  तरुणाचा मृतदेह निगडे (ता. मावळ) आढळून आला. ही घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. मृत्यूचे नेले कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मारुती महादेव खेंगले (वय 30, रा. निगडे, ता. मावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती खेंगले हा बुधवारी (दि.9) सकाळी सडे दहा वाजता घरातून काही सांगता निघून गेला. तो परत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली.

अखेर शुक्रवारी (दि.11) दुपारी 12  वाजता खेंगले हरवल्याची तक्रार वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता निगडे गावच्या हद्दीत डोंगराजवळ वडाच्या झाडाखाली म्हैस चारणाऱ्या गुराख्याला उग्रवास आला.

त्यामुळे त्याने पोलीस पाटील संतोष भागवत यांना बोलावून खात्री केली असता तेथे मारुती खेंगले यांचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. खेंगले यांच्यामागे पत्नी, लहान 2 मुले आहेत.

या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. विष प्राशनाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस कमर्चारी दिलीप सुपे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.