Vadgaon Maval : रक्तदान शिबिरात 53 जणांचे रक्तदान

लायन्स क्लब ऑफ वडगांव, जैन सकल संघ वडगांव, स्व. सोहनलाल हिराचंद बाफना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्व. सुषमा सुनील बाफना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जैन स्थानक वडगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या प्रसंगी डॉ.सुनील बाफना, मनोज बाफना, जितेंद्र रावल, अमोल मुथा, झुंबरलाल कर्णावट, बाळासाहेब बोरावके, हर्षल बाफना, चेतन बाफना , आदेश्वर बाफना, नवीन बाफना आदी उपस्थित होते. प्रत्येक रक्तदात्यांस भेटवस्तू , रक्तदान प्रमाणपत्र देण्यांत आले. शिबिराचे हे तिसरे वर्ष आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.