Bhosari : घरफोडी करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 71 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. ही घटना कासारवाडी येथे मंगळवार (दि. 31) ते गुरुवार (दि. 2) दरम्यान घडली.

प्रसुनप्रिया कौशल किशोरलाल दास (वय 32, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दास यांचे घर मंगळवारी (दि. 31) दुपारी साडेपाच ते गुरुवारी (दि. 2) सकाळी दहा या कालावधीत कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट कशाच्या तरी साह्याने उचकटून 25 ग्रॅम सोन्याचे व 10 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम असा 71 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.