Vadgaon Maval : पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात उत्साहात पार पडला सामुदायिक विवाह सोहळा

एमपीसी न्यूज – स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सामुदायिक विवाह सोहळा सोमवारी (दि. २५) उत्साहात पार पडला. कोरोना साथीमुळे मागील दोन वर्ष हा उपक्रम थांबला होता. कोरोना साथ आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल होताच पुन्हा या उपक्रमाचे आयोजन केले. नववधू वरांची मिरवणूक, साखरपुडा, हळदी अशा सर्व परंपरा पाळून हा सोहळा पार पडला. सर्व वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यास उपस्थित राहून माजी मंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, हभप मंगल महाराज जगताप, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, बापूसाहेब भेगडे यांनी शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले. माजी उपसभापती गणेशअप्पा ढोरे यांनी स्वागत केले. यावेळी जेष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना घारे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, जेष्ठ नेते अशोक बाफना, निवृत्ती दाभाडे आदी उपस्थित होते.

 

दरम्यान, पहाटे श्री पोटोबा महाराजांच्या अभिषेकाने व स्व.पै.केशवराव ढोरे यांच्या प्रतिमापूजनाने या सोहळ्याची सुरुवात झाली, सकाळी संपन्न झालेल्या साखरपुडा समारंभप्रसंगी संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव यांनी स्वागत केले, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी शुभेच्या दिल्या.
पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी शुभाशीर्वाद दिले तर नगराध्यक्ष मयुर ढोरे व राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा दीपाली गराडे यांनी शुभेच्छा दिल्या.

 

सोहळ्यास माजी जिल्हापरिषद सदस्य नितीन मराठे, उपनगराध्यक्षा पुनम जाधव,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगरसेवक प्रवीण चव्हाण, राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, किरण म्हाळसकर, राहुल ढोरे, चंद्रजित वाघमारे, दिनेश ढोरे, शारदा ढोरे, माया चव्हाण, सायली म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा पद्मावती ढोरे, माजी सरपंच नंदाताई ढोरे, नारायण ठाकर, अरुण पवार, अंकुश आंबेकर, राज खांडभोर, विजय सातकर, संतोष जांभुळकर, प्रकाश आगळमे, अजित वहिले, शेखर वहिले आदी उपस्थित होते.

 

दुपारी सर्व वधूवरांचा हळदी समारंभ पार पडला, त्यानंतर सर्व नवरदेवांची बँडपथक, वाजंत्रीपथक भव्य मिरवणूक काढण्यात आली, मिरवणूकीत तरुणांचा व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. वधू वरांना संसारपयोगी भांडी, पोषाख, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आली.

 

सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभर व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती करणारे प्रतिष्ठानचे संचालक विवेक गुरव यांना मावळ भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक प्रवीण ढोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी प्रास्ताविक केले, सोहळा समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी स्वागत केले, सचिव गणेश विनोदे यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक अतुल राऊत यांनी आभार मानले.

 

पदाधिकारी अर्जुन ढोरे, राजेंद्र वहिले, सदाशिव गाडे, राजेश बाफना, अरुण वाघमारे, सोमनाथ धोंगडे, शरद ढोरे, अनिल कोद्रे, रोहिदास गराडे, सुनील दंडेल,  काशिनाथ भालेराव, अविनाश कुडे, अविनाश चव्हाण, विलास दंडेल, विशाल वहिले, राकेश वहिले, मंगेश खैरे, शंकर ढोरे, अजय धडवले, महेश तुमकर, गणेश ढोरे, नंदकुमार ढोरे, खंडू काकडे, संजय दंडेल, बंटी वाघवले, संभाजी येळवंडे, विनायक लवंगारे, गणेश झरेकर, केदार बवरे, राहील तांबोळी, अक्षय बेल्हेकर, अनिकेत भगत, संतोष निघोजकर, हर्षल ढोरे, पवन भंडारी, प्रीतम बाफना, सुहास विनोदे, सुधीर ढोरे, जितेंद्र ढोरे, शशी ढोरे, अक्षय औताडे, विनोद ढोरे, आर्यन ढोरे, अभिजीत ढोरे, शिवाजी येळवंडे, अमित मुसळे, भाऊ कराळे, पवन ढोरे, कार्तिक यादव, प्रथमेश घाग, दर्शन वाळुंज, सतिश गाडे आदींनी संयोजन केले.

 

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
दरम्यान, सामुदायिक विवाह सोहळ्याचे औचित्य साधून गरवारे रक्तपेढीच्या सहकार्याने पोटोबा महाराज मंदिरामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह वऱ्हाडी मंडळींनीही रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.