Vadgaon Maval : नगरसेवकांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून अधिकार मिळण्याची मागणी

एमपीसी न्यूज- नगरसेवकांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून अधिकार मिळावेत अशी मागणी वडगाव मावळ नगर पंचायतचे नगरसेवक राजेंद्र कुडे यांनी केली आहे.

याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राजेंद्र कुडे यांनी म्हटले आहे की, वडगाव शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून विविध प्रकारची सरकारी किंवा शैक्षणिक कामे करण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात जावे लागते. बऱ्याचदा संबंधित अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतात. अशावेळी नागरिकांना कामासाठी वारंवार खेटे घालावे लागतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरसेवकांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून अधिकार मिळावेत अशी मागणी राजेंद्र कुडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.