Pune : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त वृक्ष लागवड अभियान

एमपीसी न्यूज- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त वृक्ष लागवड अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार गिरीश बापट व पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, यांच्या उपस्थितीत रविवारी ( दि. 7) टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी अभियानाचा शुभारंभ होणार आहे.

महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वन विभागाअंतर्गत सुरू आहे. या कार्यक्रमासोबतच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दी वर्षाचे आयोजन 1 ऑगस्ट 2019 ते 1 ऑगस्ट 2020 या कालावधीत करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून विविध समाजपयोगी कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, स्वारगेट यासह विविध सात ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.