Vadgaon Maval : स्पर्धा परिक्षेसाठी ऑनलाईन टेस्ट सिरिज उपक्रमाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले उद्घाटन!

एमपीसी न्यूज – स्पर्धा परिक्षा तसेच राज्यामध्ये 12500 पदासाठी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पै.सचिन घोटकुले यांच्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या रोजगार, स्वयंरोजगार कौशल्य विकास वाढीसाठी ऑनलाईन 365 दिवस मोफत टेस्ट सिरीज उपक्रमाचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले.

यावेळी महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप,पुणे शहर युवक अध्यक्ष महेश हांडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती अध्यक्षा पुजा बुट्टे,बारामती युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे आदी उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये स्पर्धा परिक्षेसाठी व पोलीस भरतीसाठी सहभागी होणाऱ्या तरुण तरुणींना या ऑनलाईन टेस्टचा फायदा होणार असून टेस्ट बनविताना परिक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करुन ऑनलाईन टेस्टची रचना करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना टेस्टची प्रश्नावली त्यांच्या व्हाॅटसअप ग्रुपवर रोजच्या रोज लिंकच्या माध्यमातून मिळणार असून टेस्ट दिल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना निकाल कळणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी सांगितले या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थितांनी कौतुक केले असून विद्यार्थ्यांना या टेस्टचा परीक्षांसाठी फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.