Vadgaon Maval – वडगावमध्ये हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ

एमपीसी न्युज: वडगाव शहरात प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ केला. प्रभागात घरोघरी जाऊन त्यांनी तिरंगा वाटप केले.(Vadgaon-Maval) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे.

भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असताना हे वर्ष अमृतमहोत्सव वर्ष म्हणून साजरे होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या “हर घर तिरंगा” (Vadgaon-Maval) अभियानाचा सुवर्णक्षण ऐतिहासिक करण्यासाठी प्रभाग क्र. 11 मधील नगरसेवक किरण रघुनाथ म्हाळसकर यांच्याकडून माळीनगर तसेच प्रभागातील रहिवाशांना राष्ट्रध्वज घरोघरी जाऊन भेट देण्यात आले.

Santosh Dabhade:संतोष दाभाडे यांच्या वाढदिवसानिम्मित शारदाश्रम वसतिगृहातील मुलांना खाऊवाटप व आर्थिक मदत

नागरिकांनी आपल्या घरावर 13 ॲागस्ट ते 15 ॲागस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज लावून “हर घर तिरंगा” या अभियानामध्ये उत्फुर्तपणे सहभागी होऊन आपल्या देशाचा अभिमान वाढवावा असे आवाहनही म्हाळसकर यांनी यावेळी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.