Vadgaon Maval : श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ येथे ग्रंथालय दिन साजरा

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला,वाणिज्य, महाविद्यालय व अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला.

ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांची जयंती (१२ ऑगस्ट) ग्रंथालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मद्रास विद्यापीठाचे ते पहिले ग्रंथपाल होते. ग्रंथालय क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांना ग्रंथालयशास्ञाचे जनक म्हटले जाते.

कला, वाणिज्य, महाविद्यालयाचे प्रा. सारिका रोकडे यांनी रंगनाथन यांचे व्यवस्थापनातील कार्य विशद केले. अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मिस्त्री यांनी वाचन संस्कृती जोपासन नवीन तंञज्ञानाचा वापर करुन विद्यार्थामध्ये व वाचकांमध्ये वाचनाची आवड विकसित करावी असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य. डॉ राजेंद्र जाधवर यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून सर्व गटातील व्यक्तीची वाचनाची गरज पूर्ण करण्याची यंञणा ग्रंथालयात असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

ग्रंथापाल प्रा.सुजाता जाधव यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील विद्यार्थी विक्रांत शेळके यांनी “ग्रंथ” यावर कविता सादर केली. संस्थेचे सचिव अशोक बाफना व अध्यक्ष तुकाराम आसवले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष शिंदे यांनी केले. आभार प्रा.हिरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.