Vadgaon Maval News : तिकोनागडाची झाली वणवा पूर्व तयारी

एमपीसी न्यूज- तिकोना गडावर वणवा पूर्व तयारी म्हणून मोठ्या प्रामाणात वास्तू जवळ तसेच वृक्षांजवळ वाढलेले गवत काढण्याचे काम भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान ,मावळ व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था (Vadgaon Maval News) यांच्या वतीने करण्यात आले.

गडावरील वेताळाचा माळ ते तळजाई माता लेणी पर्यंतचे सर्व गवत काढुन घेतले असुन सदर भागात वाळलेले गवत राहिले नसल्याने आता वणवा लागणार नाही. त्यामुळे वृक्ष , वास्तू, किटक, यांचा वणव्या पासून बचाव होणार आहे.

 

ऋतु प्रमाणे गडकिल्ल्यावर कामे करणे गरजेचे असते. म्हणजे गडावर जो ऋतु चालू आहे ती गरज लक्षात घेवून तसे काम गडावर केल्यास गडावर ज्या काही वास्तू शिल्लक राहिल्या आहेत त्या सुरक्षित राहण्या करीता मदत होते.

 

Pimpri News : त्यांच्या सहृदयतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनुभवले तारांगण

सद्याचा ऋतु पाहता गडकिल्ले, डोंगर यावर वणवे लागण्याचा हा काळ आहे. वणव्याने वृक्ष, वन्यप्राणी, किटक, पक्षी यांची किती हानी होते.वणव्यात गडावरील वास्तूंचे ही नुकसान होत असते. वास्तू जवळ तसेच वास्तू वर गवत वाढल्याने, पसरल्याने वणवा लागल्यास वास्तू वणव्याच्या आगीत तप्त होते.

वास्तूस डागडुजी नसल्याने त्यात पाऊसाचे पाणी जावून वास्तू थोड्या मोकळ्या होतात त्यात वणवा लागुन मोठ्या प्रमाणात तापमानात बदल होत राहतात. याचा वास्तूंवर सतत मारा होवून (Vadgaon Maval News) वास्तू कमकुवत होत जातात. त्यात डोंगरावर राहणारे वन्यजीव, किटक, पक्षी, वृक्ष यांना ही आगीची झळ पोहचते.

भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान मावळ व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळ यांच्यावतीने एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.