Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीचा नियोजित विकास आराखडा जनतेपुढे ठेवा; वडगाव भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – मागील पाच वर्षांपूर्वी वडगाव ग्रामपंचायत बरखास्त (Vadgaon Maval) झाल्यानंतर वडगाव नगरपंचायत स्थापन झाली. त्यानंतर वडगाव शहराच्या सर्वांगीण व भविष्यातील गरजांचा विचार करून वडगाव नगरपंचायतीचा नवीन विकास आराखडा करण्याचे काम सुरू करण्यात आले. सदरचा विकास आराखडा संबंधित एजन्सीने गावाची गरज ओळखून दळणवळण व इतर आवश्यक भविष्यातील बाबींचा विचार करून तो तयार केला. मात्र, तो प्रशासनाने अद्याप जनतेपुढे आणलेला नाही. तो जनतेपुढे ठेवण्याची मागणी वडगाव भाजपकडून करण्यात आली आहे.

यावेळी नगर पंचायत मुख्याधिकारी प्रविण निकम यांना निवेदन देताना माजी सभापती गुलाब म्हाळसकर, भाजपा शहराअध्यक्ष अनंता कुडे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, खंडू भिलारे, भाजपा उपाध्यक्ष शरद मोरे, हरिष दानवे आदि उपस्थित होते.

मागील पाच वर्षांपूर्वी, वडगाव ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर वडगाव नगरपंचायत स्थापन होऊन ती अस्तित्वात आली.  त्यानंतर वडगाव शहराच्या सर्वांगीण व भविष्यातील गरजांचा विचार करून वडगाव नगरपंचायतीचा नवीन विकास आराखडा करण्याचे काम सुरू करण्यात आले.

Pune : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मेट्रो स्थानकांची पाहणी

 

परंतु, सदरचा विकास आराखडा सर्वसाधारण सभेमध्ये ठेवून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे तरी देखील वडगाव शहरातील नागरिकांसाठी विकास आराखडा पाहण्यासाठी जाहीर होत नाही, यामागे  सत्ताधारी यांचे काही बंद दाराआड गौड बंगाल चालू आहे काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

विकास आराखडा हा वडगाव मधील शेतकरी बंधू आणि नागरिकांसाठी असून तो जाहीर होत नाही म्हणजे त्यामध्ये सत्ताधारी आणि बिल्डर लॉबी यांच्या काही अर्थपूर्ण  तडजोडीकरिता तो प्रलंबित आहे काय? अशी शंका वडगावकर जनतेच्या वतीने भाजपा शहर अध्यक्ष अनंता कुडे यांनी मुख्याधिकारी यांना विचारणा केली आहे, असे एक ना अनेक प्रश्न वडगावमधील सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे.

वडगाव नगरपंचायतीचा नियोजित विकास आराखडा त्वरित जाहीर करण्यात यावा आणि बंद दरवाज्याच्या आड होणाऱ्या तडजोडी थांबवा, अन्यथा वडगाव शहर भाजपाला तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.