Vadgaon Maval : आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विजय आपलाच – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्युज – आगामी काळात मावळ तालुक्यात (Vadgaon Maval) होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विजय नक्की आहे. असा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला. आजवर मावळ तालुक्यासाठी भरघोस निधी आणला. पुढील काळात आणखी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी पक्षाला पराभव मिळाला. तो स्वीकारून मागील चुका टाळून पुढे जायचे असल्याचा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला.

आगामी काळात मावळ तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विजय नक्की आहे. आपआपल्यात संघर्ष करु नका, प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही फक्त नीट रहा,असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले. शनिवार (दि.24) वडगाव मावळ येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी जि.प.सदस्य बाबुराव वायकर, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, महिला तालुकाध्यक्ष दिपाली गराडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी पुढे बोलताना आमदार शेळके म्हणाले की, मावळातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्व ठिकाणी आपले उमेदवार निवडून आले असते. मात्र, काही ठिकाणी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्यामुळे दोन ग्रामपंचायतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. कार्यकर्त्यांनी देखील पक्ष श्रेष्ठींच्या सूचना ऐकल्या पाहिजेत. पुढील काळात जे पक्षाचा आदेश डावलतील त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे आमदार सुनिल शेळके म्हणाले.

गद्दारी करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार – Vadgaon Maval

ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांमुळे आपले काही सदस्य व सरपंचांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच खरेदी विक्री संघ व खादीग्राम उद्योग निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा आदेश न पाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

Pune News : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस

पुढे बोलताना शेळके म्हणाले की, 1200 कोटी पैकी 600 कोटी तरी आणून दाखवा; मावळ तालुक्यातील मंजूर कामे तसेच चालू असलेल्या कामांना दिलेल्या स्थगिती वरून आमदार शेळके यांनी विरोधकांना विकासकामात राजकारण करून निधी अडवू नका असे आवाहन केले. तसेच मी मागील अडीच वर्षामध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी 1200 कोटी आणले. आता तर राज्यामध्ये तुमचे सरकार आहे. मावळातील विकासासाठी किमान 600 कोटी तरी आणा.मी तुमचा इथेच सत्कार करेल. अशी भावना व्यक्त केली.

47 कोटी तुम्ही आणले; ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरात देवावर हात ठेवून सांगा –

 

हा निधी आणला असेल तर ग्रामदैवत पोटोबा महाराज देवावर हात ठेवून सांगायचं की आम्ही निधी आणला. तसे तुम्ही केले तर मी माफी मागतो.तसेच येणाऱ्या नवीन वर्षात चौथे वर्ष सुरू होत असताना ‘वर्षे चौथे- शब्दपूर्तीचे’ असे सांगत गावागावामध्ये जो काही शब्द दिला होता, तो पूर्ण करणार. मग सत्ता असो किंवा नसो काम पूर्ण करुन देईल, असा विश्वास यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी बोलताना दिला. निवडणूक झालेल्या सर्व नऊ ग्रामपंचायतीना विकासकामांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये निधी देण्याचे आश्वासित केले.

शिरगावचे सरपंच प्रविण गोपाळे, इंदोरी सरपंच शशिकांत शिंदे, निगडे सरपंच भिकाजी भागवत, देवले सरपंच वंदना आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज खांडभोर यांनी केले.यावेळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.