Pune News : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस

एमपीसी न्यूज : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune News) यांनी रुबी हॉल हॉस्पिटल येथे भेट देऊन आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली. आमदार गोरे यांच्या उपचाराविषयी डॉक्टरांना सूचना देऊन ते लवकर बरे व्हावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सायंकाळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही रुबी हॉल हॉस्पिटल येथे आमदार गोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, रुबी हॉल हॉस्पिटलचे संचालक डॉ. परवेझ ग्रँड आदी उपस्थित होते.

Moshi : लेखकांनी साहित्यिकांनी एखाद्या प्रश्नावर भूमिका मांडली पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुख

फलटणजवळ आमदार गोरे (Pune News) यांच्या वाहनाला अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुबी हॉल हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.