Swatantraveer Savarkar Defence Academy : स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अॅकडमी तर्फे अकरावी-बारावी सोबत एनडीए प्रवेश परिक्षेसाठी मिळणार मोलाचे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – अकरावी-बारावीनंतर केवळ डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचं नाही, काही तरी वेगळं करण्याची इच्छा आहे. असे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अॅकडमीला (Swatantraveer Savarkar Defence Academy) नक्की भेट द्या. कारण सावरकर डिफेन्स अकॅडमी ही या वर्षीपासून  NDA  बरोबरच AFMC, MNS, IIT, NEET, JEE, MHCIT याचीही तयारी करून घेणारे वर्ग सुरु करणार आहे. यासाठी अकरावी उत्तीर्ण मुला-मुलींसाठीच्या Integrated Defence Program ची प्रवेश प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु केली आहे. त्यात प्रथम येणाऱ्या 40 मुलां मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ही मान्यताप्राप्त सामाजिक संस्था गेली 38 वर्ष कार्यरत असून सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, धार्मिक,मातृशक्ती सबलीकरण या क्षेत्रात प्रबोधनात्मक काम करणारी मान्यवर संस्था म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात प्रसिद्ध आहे.
दहावीनंतर मेडिकल, इंजिनियरिंग इत्यादी क्षेत्रात जाण्यासाठीच्या IIT, NEET, JEE, MHCIT अशा प्रवेश परीक्षांची तयारी प्रामुख्याने सर्वच करतात. पण, या बरोबरच NDA प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या अस्थापना खूपच कमी असल्याने यावर्षी पासून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी, NDA मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (मुली,मुले) NDA बरोबरच AFMC, MNS, IIT, NEET, JEE, MHCIT याचीही तयारी करून घेणारे वर्ग सुरु करणार आहे.
 स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आपल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अॅकडमी’च्या (Swatantraveer Savarkar Defence Academy) माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून NDA प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग चालवित असून अवघ्या 4 बॅचेसमधून 6 विद्यार्थी यशस्वीपणे NDA मध्ये निवडले जाऊन कार्यरत झाले आहेत.

यामध्ये Integrated Defence Program द्वारे अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधीच असणार आहे. NDA मध्ये जाण्याचे प्रमुख ध्येय ठेऊन त्याच बरोबर इतर प्रवेश परीक्षांची तयारीही करणाऱ्या राष्ट्रप्रेमी मुलांनाच प्रामुख्याने प्रवेश दिला जाणार आहे. निवृत्त सेनाधिकारी ब्रिगेडियर बलजितसिंग गिल, ब्रिगेडियर हेमंत महाजन अशा या क्षेत्रातील मान्यवर व इतर विषयातील तज्ञ प्राध्यापकांची टिम यासाठी असणार असून रोजच्या दैनंदिन अध्यापनात NDA पात्रतेचा विचार करून तंत्रशुद्ध शारीरिक शिक्षण, प्रशिक्षण व सराव यांचाही सहभाग असणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या प्राधिकरण निगडीच्या वास्तूमध्येच याचे नियोजन केले जाणार असून आवश्यक असल्यास निवास व्यवस्थाही केली जाणार आहे.

TATA Motors : टाटा मोटर्स कंपनीची वादग्रस्त नोटीस अखेर रद्द

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मनात व कृतीत आचरणात आणणारी संस्था (Swatantraveer Savarkar Defence Academy) असल्याने ना नफा, ना तोटा या तत्वावरच हा उपक्रम मंडळातर्फे राबविला जाणार आहे. माफक फी मध्ये राष्ट्रभक्त मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हा उपक्रम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर डीफेन्स अॅकडमीतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी इतरांपेक्षा वेगळा, राष्ट्रप्रेमाने प्रेरित, एक जबाबदार नागरिक, शारीरिक मानसिक व शैक्षणिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम होऊनच बाहेर पडेल, अशीच सर्वांगीण तयारी अकरावी-बारावीच्या दोन वर्षात करून घेतली जाणार आहे.
या अभ्यासक्रम किंवा प्रवेशप्रक्रिये विषयी अधिक माहितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, से. 25 प्राधिकरण, निगडी येथे प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा 9881466372 /8698695256 / 7972475601/ 8446422965 या चार क्रमांकावर संपर्क साधू शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.