Science Park : सायन्स पार्कमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या (Science Park) उपजत कला गुणांना वाव देण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा वाढीसाठी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने दिवाळी सुट्टीतील विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

मंगळवारी (दि.25) रोजी होणा-या खगोलीय घटनेत स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 ते 5.30 या वेळेत खंडग्रास सूर्यग्रहण दुर्बिणीला विशेष सोलर फिल्टर लावून पाहता येणार आहे. 1 व 2 नोव्हेंबर रोजी ‘रोबोट’ विषयावर कार्यशाळा, गमतीशीर विज्ञान गणितावर आधारीत कार्यशाळा दोन बॅचेसमध्ये होणार आहे.

1, 2, 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी साहित्यमूल्य नोंदणीसह (Science Park) संपन्न होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी दिसणारे खग्रास चंद्रग्रहण दुर्बिणीद्वारे पाहण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामध्ये जास्तीत-जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. कार्यशाळेसाठी नाव नोंदणी सायन्स पार्क कार्यालयात करता येईल. अधिक माहितीसाठी 77449444333 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.