Vehicle Theft News : शहराच्या विविध भागातून आठ दुचाकी व एका ट्रकची चोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून आठ दुचाकी आणि एक ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत रविवारी (दि. 31) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अक्षय सुनील मोहिते (वय 26, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहिते यांचा पाच लाख रुपये किमतीचा ट्रक (एम एच 43 / यु 9262) अज्ञात चोरट्यांनी दिघी येथील किंग्डम सोसायटी समोरील सर्व्हिस रोडवरून चोरून नेला. हा प्रकार शनिवारी (दि. 30) रात्री नऊ ते रविवारी (दि. 31) सकाळी अकरा या कालावधीत घडला.

स्टीफन सॅमसन आल्हाट (वय 20, रा. घरकुल चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 35 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एफ व्ही 0642) अज्ञात चोरट्यांनी जुना पुणे-मुंबईरोडवरील एका दुकानासमोरून चोरून नेली. हा प्रकार 19 जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात या कालावधीत घडला आहे.

संजय सॅम्युअल पीटर्स (वय 55, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 25 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी ई 8933) अज्ञात चोरट्यांनी समृद्ध अपार्टमेंट आकुर्डी येथील सार्वजनिक रोडवरून चोरून नेली.

मुकेशकुमार पंचानंद सिंग (वय 36, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंग यांची आठ हजारांची दुचाकी त्यांच्या राहत्या सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 31) सकाळी उघडकीस आला.

सुनील चंद्रकांत लंके (वय 30, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लंके यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 16 / बी क्यू 5299) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. 30) सकाळी उघडकीस आला आहे.

बिकलप चंद्र भोमीक (वय 68, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोमीक यांची 25 हजारांची मोपेड दुचाकी अज्ञातांनी खराळवाडी,पिंपरी येथील पोस्ट ऑफिस समोरून चोरून नेली. हा प्रकार 27 जानेवारी रोजी रात्री पावणे बारा वाजता घडला.

सच्चीदानंद कपिलदेव गौड (वय 32, रा. खंडोबा माळ, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौड यांची पाच हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए बी 8486) अज्ञात चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली आहे.

विनायक शिवानंद शिरोळ (वय 23, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरोळ यांची 30 हजारांची दुचाकी (के ए 28 / ई क्यू 1020) अज्ञात चोरट्यांनी शिरोळ यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली.

जितेंद्र शंकर पांडे (वय 33, रा. बापदेवनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पांडे यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी यु 8755) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्किंग मधून चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.