Virat Kohli : मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला विराट म्हणतो, ‘तुला परत मानला रे ठाकूर !’

एमपीसी न्यूज – पहिल्या इंनिगमध्ये भारतीय संघाच्या टेल एन्डर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजाना जेरीस आणले. त्यात मराठमोळ्या शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या खेळीची कौतुक भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले आहे. ठाकूरला विराटने मराठीत ‘तुला परत मानला रे ठाकूर!’ असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.

ब्रिस्बेनमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या इंनिगमध्ये 369 धावा चोपल्यानंतर भारतीय संघ पहिल्या इंनिगसाठी मैदानात उतरला. मात्र, रोहित शर्माने केलेल्या 44 धावा व्यतिरिक्त कोणीही मोठी धाव संख्या उभारू शकला नाही.

त्यानंतर  :  यांनी दमदार खेळी करत संघाची धावसंख्या तीनशे पार नेली. यामध्ये शार्दुलने (67) आणि वॉशिंग्टन सुंदरने (62) धावांची खेळी केली. या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला अवघ्या 33 धावांची आघाडी भेटली.

शार्दुल ठाकूर आणि वॉशिगंटन सुंदर यांच्या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने या दोघेचे खास कौतुक केले आहे.

विराटने आपल्या ट्वीटर हॅन्डलवर ‘शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दाखवलेल्या विश्वास अप्रतिम आहे. कसोटी क्रिकेट यालाच म्हणतात. पदार्पणातच दाखवलेल्या संयम आणि तुला परत मानला रे ठाकूर!’ असं ट्वीट केलं आहे.

शार्दुल ठाकूरने गोलंदाजीत देखील उत्कृष्ठ प्रदर्शन केले. त्याने पहिल्या इंनिगमध्ये तीन, तर दुस-या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाचे चार गडी बाद केले. ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत विजयासाठी भारतीय संघाला 328 धावांची गरज आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या 1-1 बरोबरीत आहे. भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्व क्रिडा रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.