Dapodi News : महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी युवासेनेने घेतलेले पाऊल योग्य – विश्वाजीत बारणे

एमपीसी न्यूज – महिला दिनाचे औचित्य साधत पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रभागातील महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण व इंग्रजी टायपींग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्या प्रसंगी दापोडी,फुगेवाडी भागातील 86 महिलांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड शहर युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे व पिंपरी-चिंचवड शहर संघटिका शिवसेना उर्मिला काळभोर व जेनेसिस इंडिया चे ऍड. अजित बोराडे यांच्या उपस्थितीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वाचनालय दापोडी येथे झाले.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

त्याप्रसंगी युवाअधिकारी निलेश हाके म्हणाले, आज उच्चशिक्षित असूनही चुल आणि मूल यात गुरफटलेल्या माझ्या माता, भगिनींना वेळात वेळ काढून संगणकीयदृष्या सक्षम व्हावे. आज इंग्रजी लिहिणे, वाचणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा तसेच प्रशिक्षणानंतर महापालिकेच्या नागरवस्ती विभागात संगणक प्रशिक्षित महिलांना संगणक मिळवण्यासाठी प्रयत्न करनार असल्याचे यावेळी निलेश हाके यांनी सांगितले.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

पिंपरी-चिंचवड युवा सेना सन्मवयक रुपेश कदम, विभाग प्रमुख उमेश पाटील, उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, महिला विभाग संघटिका कोमल ताई जाधव, शिवसेना शाखाप्रमुख स्वप्नील शेवाळे,गोपाळ भाऊ मोरे, अविनाश जाधव, चिंचपा निंगडोळे, अजय कदम, मनोज काची, रोहित गोरे,उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.