डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांचा दूरदृष्टीने विचार : नानाराव जाधव

एमपीसी न्यूज – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) संस्थापकांनी दूरदृष्टीने विचार केला, त्यामुळे आजही शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरविताना अडचण येत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानाराव जाधव यांनी व्यक्त केले.

डीईएसच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) विद्यार्थी वसतिगृहाचे विस्तारीकरण, अधिकारी निवास आणि जलकुंभ या प्रस्तावित नवीन वास्तूंचे भूमिपूजन करताना जाधव बोलत होते.

डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, संस्थेचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद रावत, प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Vadgaon-Maval : मी दुर्गा सेल्फी काँटेस्टला वडगावकर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाधव म्हणाले, “शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सुविधा पुरविताना संस्थांना मर्यादा येतात. परंतु डीईएसच्या संस्थापकांनी दूरदृष्टीने शिक्षण संकुलांसाठी जागांची निवड केली. त्यामुळे संस्थेचा विकास आणि विस्तार करणे सोपे झाले आहे.”
कुंटे म्हणाले, “विकासासाठी सर्वांचे हात लागणे आवश्यक असते. या प्रकल्पासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.”

उपाध्यक्ष महेश आठवले यांनी पाच ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. मुलांच्या वसतीगृहाचे विस्तारीकरण करून आणखी 120 विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार आहे. याशिवाय अधिकारी निवास, स्वच्छतागृहे, उदवहन अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.