Accident cases : दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – कुदळवाडी व पिंपळे गुरव येथील दोन वेगवेगळ्या (Accident cases) अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात व सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कुदळवाडी येथे हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि.8) रात्री घडली. देवाशिष वीरेंद्र दुबे (वय 38, रा. वाकड. मूळ रा. बिहार) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात हायवा ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुबे हे काम संपवून दुचाकीवरून कुदळवाडी ते पिंपरी येथे जात होते. कुदळवाडी ब्रिजवरून जात असताना एका हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट मारला.(Accident cases) त्यात ते खाली पडले आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक तिथे न थांबता निघून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Vadgaon-Maval : जिल्हा बँकेच्या कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

तर पिंपळे गुरव येथे भरधाव वेगातील कार ओव्हरटेक करून जात असताना दुचाकीला धक्का लागली. त्यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला.(Accident cases) ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी काटे पुरम चौक येथे घडली.

जसवंतसिंग हरजिंदरसिंग माजू (वय 36, रा. नवी सांगवी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी माजू यांच्या बहिणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या कारने ओव्हरटेक करताना दुचाकीला धक्का दिला. (Accident cases) त्यात माजू हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.