Wakad : यू ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास सांगून नागरिकाची 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – यू ट्यूब वर चॅनल सबस्क्राईब करायला  सांगून एका 42 वर्षीय (Wakad) नागरिकाची 35 लाखांची  फसवणूक कऱण्यात आली आहे. ही फसवणूक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वाकड येथे घडली आहे.

 

याप्रकरणी योगेश माधवराव सोनार (वय 42 रा.कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शांभवी सोनी, टेलीग्राम खाते धारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Nighoje : दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने 9885419725 या मोबाईल क्रमांकावरून आरोपीने फिर्यादीस संपर्क साधला. यावेळी कोणतीही गुंतवणूक न करता केवळ व्हॉटसअप द्वारे यु ट्यूब सबस्क्राईब  करून टास्क पुर्ण करण्यास सांगितले.

 

फिर्यादी यांना सुरुवातीला फायदा होत असल्याचे भासवून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी वेगवगेळ्या बँक खात्यावर असे एकूण 35 लाख 35 हजार 364 रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली.यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील (Wakad) तपास करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=i-EMCHflbtI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.