Wakad : महिलेचे अश्लिल फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केला. तसेच अश्‍लिल फोटो नातेवाईकांना पाठवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना वाकड येथे घडली. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आशिष पांडे (वय 32, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास थेरगाव येथे घडली. आरोपी पांडे हा फिर्यादी यांचा वेळोवेळी पाठलाग करून प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी करीत होता. तसेच त्यांचे पती, सासू व इतर नातेवाईकांना अश्‍लील फोटो पाठविण्याची तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीलाही शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.