Wakad : पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार; तिघांवर गुन्हा दाखल

Attack on youth out of prejudice; Charges filed against three

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर तिघाजणांनी धारदार शस्त्राने वार केले. ही घटना थेरगाव येथे मंगळवारी (दि. 26) रात्री घडली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नन्या ऊर्फ सौरभ माळवदकर (रा. मंगलनगर, थेरगाव) आणि त्याचे दोन तोंडओळखीचे साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अतुल शामसुंदर यादव (वय 23, रा. तळजाई कॉलनी, लेन नं. 3, थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी यादव हे आपल्या मित्रांसोबत घराजवळील मैदानात गेम खेळत बसले होते.

त्यावेळी आरोपी दुचाकीवरून तिथे आले. ‘तू बच्चा यादव सोबत का फिरतोस’, असे म्हणत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून पालघन सारख्या हत्याराने फिर्यादी यांच्यावर वार केले.

अन्य दोन आरोपींनी लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचे मित्र व आसपासचे नागरिक यादव यांना वाचविण्यासाठी आले असता आरोपीने त्यांना शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like