Wakad Burglary : वाकड येथे घरफोडीत दिड लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज : वाकड येथे घरफोडी करून चोरट्याने सोने आणि चांदीचे दिड लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना 10 ते 13 ऑगस्ट या कालावधीत कस्पटे वस्त येथे घडली.(Wakad Burglary) याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण गंगाधरराव सोनटक्के (वय 34, रा. कस्पटे वस्ती रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News: अ क्षेत्रिय कार्यालयांतर्गंत स्मार्ट सिटी प्रकल्प प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित होणार- राजेश पाटील 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.(Wakad Burglary) घरातून 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 90 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने अशी एक लाख 65 हजार 200 रुपयांची चोरी केली. या प्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.