Wakad : घरात येऊन गप्पा मारत चोरली सोन्याची बांगडी

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरात जाऊन (Wakad) तिच्याशी गप्पा मारत तिच्या हातातील एक लाख 35 हजारांची सोन्याची बांगडी पाहायला म्हणून घेतली. त्यांनतर महिलेला पाणी आणायला सांगून तो पसार झाला. हा प्रकार 14 नोव्हेंबर रोजी दुपारी दत्त मंदिर रोड वाकड येथे घडला.

गणेश घुले (वय 35, रा. शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि. 24) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश हा फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादींशी गप्पा मारताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी बघितली. ही सोन्याची बांगडी आहे का, असे म्हणून पाहण्यासाठी फिर्यादीच्या हातातील सोन्याची बांगडी घेतली. दरम्यान त्याने तहान लागली असल्याने पाणी आणण्याची विनंती केली. फिर्यादी महिला किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या असता गणेश घरातून निघून गेला. त्यानंतर (Wakad) महिलेने गणेशला फोन केला. तो पाच मिनिटात परत आलो म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.

Pune : 200 कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलेची 79 लाखांची फसवणूक

त्यानंतर फिर्यादी महिला गणेशच्या घरी गेल्या असता तो घरी देखील भेटला नाही. त्यामुळे दहा दिवसानंतर याबाबत एक लाख 32 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगडीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.